हिरवाई, रोषणाई आणि कारंजांचा आनंद
पुणे : सायंकाळ होऊ लागली की, आकाशातले रंग व आपल्या सभोवती उसळणाऱ्या कारंजांमध्ये मिसळणारे विजेच्या दिव्यांच्या रोषणाईचे रंग, यांपैकी काय बघावं असं होत असतं. मुलांनाच काय, मोठ्यांनाही या मुघल गार्डनमध्ये भान विसरायला होतं.
सिंहगड रस्त्यावरील पु. ल. देशपांडे उद्यानाच्या विस्तारित भागात तयार करण्यात आलेलं 'मुघल गार्डन' हे उद्यान संस्कृतीतील वेगळी शैली दर्शवतं. लाल रंगाची भव्य इमारत, जाळीदार खिडक्या, वाहणारं पाणी, प्रवाहात दिसणारी पाण्याची वलयं, कारंजांमधून उड्या मारणारं पाणी, सभोवतालची रम्य हिरवळ असा सगळा स्वप्नातल्यासारखा वाटणारा हा परिसर.
(नीला शर्मा)